“One book, one pen, one child and one teacher can change the world.” - Malala Yousafzai
1985 ते 1997 स्वामी विवेकानंद विद्यालय येसगांव खु.
1997 ते 2013 पं .ज .ने.माध्यमिक शाळा.पाटणे
2013ते 2024 जनता विद्यालय वजिरखेडे
Tought Sujects like Math,PT,Social Science.
Sports Person
Near about 35 School trips arranged by him.
strong relationships with their students by being warm, available, and kind
Read More“Education is not the filling of a pail but the lighting of a fire.” - William Butler Yeats
दादा म्हणजे जाधव परिवाराचे आधारस्तंभ, उत्तम मार्गदर्शक, सात मामांचे लाडके भाचे. म्हणून आमच्या सात घरात कुठल्याही सुख दुःखाचा प्रसंग असेल तर, तर दादा आवर्जून त्या ठिकाणी उभे राहतात. आमच्या घरातील कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम दादांच्या सल्याशीवय आजही होत नाही. भावां बहिणींचे शिक्षण असो किंवा लग्न कुटुंबातील ज्येष्ठ असल्याकारणाने जबाबदारी यशस्वी रित्या पार पडली. त्यामुळे आज संपूर्ण दातर्ति गावात गवळे परिवार आदर्श परिवार मानला जातो. दातर्ती सारख्या खेडेगावातून संगमेश्वर येथे नोकरी निमित्ताने येऊन रहिवासी झाले. आज संगमेश्वराच्या कानाकोपऱ्यात गवळे सर हे नाव सूपरिचित केले...
रिटायरमेंट बद्दल तुला खूप खूप शुभेच्छा.कितीतरी मुलांचे छान भविष्य घडले आणि हजारो मुलांच्या ह्रुदयात स्थान मिळवलेस. शिक्षक म्हणजे खूप सुंदर जॉब असतो थेट विद्यार्थ्यांच्या ह्रदयात खूप आदराचे स्थान मिळते आणि तात्पुरते नाहीतर कायमचे असते. तुझ्यासोबत खूप blessings आहेत तुझे विद्यार्थी, आपले parents आणि आम्ही सगळं कुटुंब.आता नविन inning सुरू झाली आहे. So enjoy as u wish एकदम धम्माल लाईफ पण त्यात मात्र देवाची भक्ती शामील कर, So अजून छान वाटेल. Actually तू खूप भाग्यवान आहेस. हे मी एकटीच नाही तर आपली पूर्ण family म्हणत असते आणि ते खरंही आहे..तुझ्यावर भगवंताची विशेष कृपा आहे.आवड्या मायची पुण्याई,ताई नानांचे आशीर्वाद.तुझी जोडीदार पण खूप प्रेमळ आणि समजदार आहे. कौतुक करावे तेव्हढे कमीच लहान वयात लग्न होऊन घरातील मोठ्या सुनेची जबाबदारी without any complaint सांभाळत आहे.Thanks to her. दोन्ही मुलेही Well settled आहेत.आता काहीच काळजी नाही त्यामुळे मस्त आनंदीत रहा आणि खूप भक्ति कर .मी ही तुझी लाडकी बहिण सो मलाही वेळ द्यायचा आहे.किती लिहू असे झाले आहे...खूप खूप शुभेच्छा. कधीही म्हातारे व्हायचे नाही आता पुन्हा लहान व्हायचे.love you dear Bro🤗
सर आमच्यासाठी मोठ्या भावासमान आहेत.माझी मुले गवळे सरांच्या अंगा खांद्यावरचे. मुलगी समृध्दी ही त्यांनीच सांभाळली. आमचे कौटू्ंबिक संबंध अतिशय जिव्हाळयाचे.सुखंदुःखात एकमेकांबरोबर असतो , कुटुब सहल ही आमची दर वर्षी ठरलेलीच आसते.गवळे सर म्हणजे एक अजातशत्रु. हसत खेळत व्यक्तिमत्व. कोणाशीही कधी भांडण नाही, वैर नाही, तात्विक भांडण तेवढयापूर्ते, असा हा विद्यार्थी प्रिय शिक्षक नव्हे तर संस्थेतील सर्वांना आवडते ज्येष्ठ शिक्षक , सामाजिक , शैक्षणिक कामाची आवड, महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था कर्मचारी पतपेढीच्या चेअरमनपदी ही ते होते.
गवळे सरांनी फुलवल्या अध्यापनासवे हास्याच्या बागा अलकाताईने गुंफला अचूक नात्यांमधला अतूट धागा संदेश आकांक्षाच्या सुरांनी जीवनाची मैफिल सजली अशातच शंभूच्या एंट्रीने मैफिल बहारदार झाली गवळे फॅमिलीचा भूषण म्हणजे भूषण आणि दीदी आम्ही देखीली या जन्मी 'शिव' संस्कारांची नांदी.
आमचे मोठे भाऊ म्हणजे दादा आम्ही एका खेड्या गावात जन्मलो आमचे आई-वडील शेतकरी आम्ही चार भाऊ आणि एक बहीण आमच्या वडिलांनी शेतीवर आपले उपजीविका भागवत असताना माझ्या मोठ्या भावाला म्हणजे दादांना शिक्षक व्हायचे स्वप्न दाखवले आणि ते त्यांनी त्या खरतर परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केले त्यांच्या शिक्षणासाठी आमच्या वडिलांकडे पूर्णतः पैसा नव्हता वडिलांनी व आईने मोलमजुरी करून त्यांना शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे डीएड कॉलेज येथे पाठवले आणि तेथून त्यांचा जीवनाचा प्रवास अजून जास्त खडतड बनला शिरपूरहून शिक्षण घेऊन ते गावी आले गावी येऊन परत वडिलांकडे नवीन समस्या आता आपल्या मुलाला नोकरी कोण देईल मग त्या कठीण काळात आम्हाला आमचे मामा म्हणजे जाधव परिवार संगमेश्वर त्यांनी दादांना मोठा सहारा दिला आणि दादांनी त्या संधीचं सोनं केलं त्यांना पहिली शिक्षकाचे नोकरी येसगाव येथे मिळाली आणि मग वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले मग तेथून त्यांनी आम्हा चारी भावंडाचे शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आमचे शिक्षण चालू असताना बहिणीचे लग्न म्हणजे त्यांच्यापुढे मोठे आव्हान होते मग त्यांनी मेहनत करून बहिणीचे लग्न केले बहिणीचे लग्न झाल्यानंतर आमचे भाऊ अण्णा त्यांना बीएपर्यंत शिकवले त्यानंतर आप्पांना धुळ्शेतकी कॉलेजमध्ये शेतकी डिप्लोमा करण्यासाठी पाठवले शेवटी मला आपल्याजवळ ठेवून आयटीआय करून दिले आणि उद्योगाशी जोडले आणि एवढे करत असताना आई-वडिलांना सुद्धा म्हातारपण आले होते मग ती जबाबदारी सुद्धा त्यांनी व आमच्या वहिनीसाहेब यांनी पार पाडली आणि एवढे करून सुद्धा आता ते आमच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी पूर्ण करत आहेत मुलांना कोणते शिक्षण द्यायचे कुठे द्यायचे ही जबाबदारी आता ते स्वतः आपल्या जबाबदारीने पूर्ण करत आहेत.
Home:
Call me:
Mail me:
Follow me:
The contact form is currently inactive. Get a functional and working contact form with Ajax & PHP in a few minutes. Just copy and paste the files, add a little code and you're done. Download Now.